आ.सावकारे यांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी (व्हिडीओ)

aa. savkare

 

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा निवडणूक मतदार संघातील भाजपा, शिवसेना, आरपीआय, रासप महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आज (दि.16) रोजी गोजोरे, वराडसिम, बेलव्हाय, सुनासगाव, वांजळे आदी भागात पत्नी रंजनी सावकारे यांच्यासह झंझावती प्रचार केला. यावेळी गावागावात फटाक्यांची आतषबाजी करत आ. सावकारे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

गोजोरे येथे सकाळी 8 वाजता आ. सावकारे यांचे आगमन झाले. यानंतर त्यांनी विठ्ठल मंदिरासह विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत प्रचारास प्रारंभ केला.  या प्रचार दौर्‍यात पं.स. सभापती प्रीती पाटील, माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य मनीषा पाटील, माजी उपसभापती गोलू पाटील, माजी सभापती सुनील महाजन, राजेंद्र चौधरी, कृउबा समितीचे माजी सभापती सोपान भारंबे, कुऱ्हे पानाचे येथील माजी सरपंच सुभाष पाटील, माजी जि.प सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, खडका येथील भैया महाजन, संजय पाटील, किन्ही येथील ए.टी.पाटील, एल.एस.पाटील, माधव पाटील, गोजोरे येथे माजी सरपंच शिवाजी पाटील, भूषण कोळी, कौतिक ठोंबरे, पद्माकर पाटील, दिलीप कोळी, किशोर राणे, रामा कोळी, वराडसीम येथे माजी सरपंच अविनाश वायकुळे, कृउबा समितीचे संचालक दिगंबर वाणी, माजी सरपंच निवृत्ती मावळे, एकनाथ पाटील, माजी सरपंच कोल्‍हे, दीपक ढाके, आत्माराम कोळी, देवदास पढार, ग्रा.पं.सदस्य प्रकाश ठाकूर, मनोज कोल्हे, दिपक ढाके, सुभाष कोळी, निलेश वायकोळे त्याचप्रमाणे बेलव्हाय येथे नवीन पेटकर, दिगंबर भंगाळे, कृष्ण तुषार, राकेश खाचणे, सागर पवार, तेजस सोनवणे, सिद्धार्थ पवार आदी कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content