सुरक्षितेची काळजी घेत इम्पोरीयल स्कूलमध्ये अध्यापनास प्रारंभ

 

पाळधी, प्रतिनिधी । येथील इम्पोरीयल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता ९ वी व १० पर्यंतचे वर्ग शासकीय नियमांचे पालन करून सुरु करण्यात आले आहे.

इम्पोरीयल इंटरनॅशनल शाळा सुरु करण्यापूर्वी शाळेची इमारत व परिसर स्वच्छ करून सॅनिटाइझ करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शाळेच्या इमारतीत प्रवेश देण्यापूर्वी गेटवर अंतर ठेवून हात सॅनिटाइझ करून मास्क लावल्याची खात्री करून थर्मल स्कन व ऑक्सिजन लेवल तपासणी करून प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांनी पिण्याच्या पाण्याच्या बोटल्स घरूनच आणल्या होत्या. विद्यार्थ्यांना विनाकारण विविध वस्तूंना हात न लावणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ करणे बाबतच्या सूचना देण्यात आल्या. गणित, इंग्रजी, विज्ञान, समाजशास्त्र, आयटी विषयांच्या तासिका घेण्यात आल्या. तासिका संपल्यानंतर प्रत्येक वर्गाला सोडतांना १० मिनिटांचे अंतर ठेवून सोडण्यात आले. यासाठी शाळेचे चेअरमन इंजिनिअर नरेश चौधरी, प्राचार्य महेश कवडे, समन्वयक गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज झाले. यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Protected Content