…अखेर अशोक गेहलोत सरकारने विश्वास ठराव जिंकला !

जयपूर (वृत्तसंस्था) राज्यातील अशोक गेहलोत सरकारने अखेर विधानसभेत विश्वास ठराव जिंकला आहे. यानिमित्ताने भाजपचा ‘ऑपरेशन कमळ’ अयशस्वी ठरलेय.

 

विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी शुक्रवारी राजस्थान सरकारविरोधात भाजपा अविश्वास प्रस्ताव आणणार आहे, अशी घोषणा केली होती. अशोक गेहलोत सरकार लवकरच पडणार आहे असेही भाजपाने म्हटले होते. परंतू परंतु खुद्द गेहलोत सरकारकडून विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला गेल्यानं भाजपने ‘यू-टर्न’ घेत अविश्वास दर्शक ठरावाची योजना बाजुला ठेवली. त्यानंतर अशोक गेहलोत सरकारने अखेर विधानसभेत विश्वास ठराव जिंकला आहे. अनेक वादानंतर विधानसभा अधिवेशन बोलावण्यात आले होते. दरम्यान, कॉंग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी यांची भेट घेतल्यानंतर आपली बंडाची तलवार म्यान केली होती. त्यामुळे कॉंग्रेस पुन्हा एकदा स्पष्ट बहुमतात आली होती.

Protected Content