रावेरची लढत होणार तिरंगी; १८ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर कृषी उपन्न बाजार समितीत तिन पॅनलमध्ये म्हणजे तिरंगी लढत होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत ८८ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतले असून बाजार समितीच्या १८ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.

रावेर कृषी उपन्न बाजार समितीची रणधुमाळीला सुरुवात झाली असुन आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ८८ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने आता १८ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. रावेर बाजार समितीमध्ये मध्ये पहीले महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल, दूसरे भाजपा सेनेच लोकमान्य शेतकरी पॅनल आणि तिसरे परीर्वतन शेतकरी पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.

Protected Content