यावल कृउबा समिती निवडणूकीत “मविआ आणि भाजप-शिवसेना” आमने सामने

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी १०० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने १८ जागेसाठी निवडणूकीच्या रिंगणात आता ४१ उमेदवार राहिले आहे. यात महाविकास आघाडीचे शेतकरी विकास पॅनल तर भाजप- शिवसेना (शिंदे गट) यांच्या सहकार पॅनलमधे समोरासमोर लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवाय यात पाच अपक्ष उमेदवारही नसीब अजमावत आहेत.

महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलचे नेतृत्व आ. शिरीष चौधरी, माजी आ. रमेश चौधरी, नितीन चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी हे नेतृत्व करीत आहेत तर सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, शरद महाजन, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, गणेश नेहेते, पांडूरंग सराफ, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील करत आहेत.

महाविकास आघाडीचे उमेदवार (शेतकरी विकास पॅनल)
1. सहकारी सोसायटी मतदार संघातून प्रभाकर नारायण सोनवणे, केतन दिगंबर किरंगे, ज्ञानेश्वर श्रीधर ब-हाटे, भानुदास दगडू चोपडे, विनोदकुमार पंडितराव पाटील, अनिल दंगलराव साठे, प्रदीप बाळकृष्ण पाटील, योगेश सिताराम पाटील (ईमाव), नयना चंद्रशेखर चौधरी,नंदा गोपाळ महाजन (महिला राखीव), अनिल प्रल्हाद पाटील (विजा/भज)

2. ग्रामपंचायत मतदार संघातून – सर्वसाधारण मध्ये सुनील नामदेव फिरके, शेखर सोपान पाटील, सुलेमान कान्हा तडवी (अनु. ज.) पोर्णिमा राकेश भंगाळे (आर्थिक दुर्बल).

3. व्यापारी मतदारसंघातून अशोक त्र्यंबक चौधरी, सैय्यद युनूस सैय्यद युसुफ.

4. हमाल मापारी मतदारसंघ सुनील वासुदेव बारी

भाजप शिवसेना (शिंदे गट) -सहकार पॅनल
सहकारी सोसायटी मतदार संघ – राकेश वसंत फेगडे, हर्षल गोविंदा पाटील, सागर राजेंद्र महाजन, दीपक नरोत्तम चौधरी, पंकज दिनकर चौधरी, उमेश प्रभाकर पाटील, संजय चुडामन पाटील, नारायण शशिकांत चौधरी (ईमाव), कांचन ताराचंद फालक, राखी योगराज बऱ्हाटे (महिला राखीव), उज्जैनसिंग भावलाल राजपूत ( विजा/ भज),

ग्रामपंचायत मतदार संघ – सर्वसाधारण विलास चंद्रभान पाटील ,सूर्यभान निंबा पाटील, यशवंत माधव तळेले (आर्थिक दुर्बल घटक), दगडू जनार्दन कोळी (अनु.ज.)

व्यापारी मतदारसंघ – जितेंद्र पद्माकर चौधरी, निलेश सुरेशचंद्र गडे
हमाल मापारी तोलारी मतदारसंघ :- सचिन पंढरीनाथ बारी

तर अपक्ष उमेदवारांमध्ये
ग्रामपंचायत मतदार संघात – सत्तार सुभान तडवी, योगराज यशवंत सोनवणे, नंदकिशोर एकनाथ सोनवणे, यशवंत तुळशीराम सपकाळे तर व्यापारी मतदार संघात नरेंद्र आबाजी पाटील असे पाच उमेदवार रिंगणात आहेत.

ही माहिती निवडणूक अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापाल पी.एफ.चव्हाण यांनी दिली आहे. मावळते सभापती तुषार सांडूसिंग पाटील यांची रिंगणातून माघार गेल्याने पंचवार्षिक कार्यकाळात भाजपा शिवसेनेच्या माध्यमातून अडीच वर्षे सभापतीची धुरा सांभाळणारे तुषार सांडूसिंग पाटील यांनी रिंगणातून माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलेच चर्चेला उत आला होता.

Protected Content