प्रॉपर्टीचा वाद : लहान भावाकडून मोठ्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील शिवदत्त नगर येथे सामाईक प्रॉपर्टीच्या कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून दुखापत केली व घरातील सदस्यांना शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना १६ जून रोजी सकाळी ८ वाजता घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, राम अवतार रघुनाथ लोधी वय-३५, रा.शिवदत्त नगर, भुसावळ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांच्याच घराच्या शेजारी त्यांचा लहान भाऊ तुलसीराम रघुनाथ लोधी व त्यांची पत्नी दुर्गेश तुलसीराम लोधी हे दोघेजण वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्यात सामाईक प्रॉपर्टीचा वाद काही वर्षांपासून सुरू आहे. त्या कारणावरून १६ जून रोजी सकाळी ८ वाजता रामअवतार रघुनाथ लोधी हे घरी असताना त्यांचा लहान भाऊ तुलसीराम रघुनाथ लोधी व त्यांची पत्नी दुर्गेश तुलसीराम लोधी यांनी रामअवतार लोधी यांना शिवीगाळ चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच हातातील लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना दुखापत केली. तसेच त्यांच्या घरातील सदस्यांना शिवीगाळ करत जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या घटनेप्रकरणी सोमवारी १ जुलै रोजी दुपारी ४ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात मारहाण करणारे तुलसीराम रघुनाथ लोधी आणि त्यांची पत्नी दुर्गेश तुलसीराम लोधी या दोघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रमण सुरळकर हे करीत आहे.

Protected Content