चक्कर येवून पडल्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरात परिसरात चक्कर येवून पडल्याने तरूणाचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हर्षल रमेश येवले (वय-३०) रा. शिवाजी नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, हर्षल येवले हे आपल्या कुटुंबासह जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसरात वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २१ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास शिवाजी नगरातून पायी जात असतांना त्याला अचानक चक्कर येवून तो बेशुध्द पडला. त्याला तातडीने खासगी वाहनाने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी मयत घोषीत केले. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ शशिकांत पाटील हे करीत आहे.

Protected Content