Home क्राईम विजेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

विजेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू

0
117


पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील ३४ वर्षीय तरूणाला विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान आनंद मोरे (वय-३४) रा. आंबेडकर नगर, पहूर पेठ, ता. जामनेर असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आहे.

पहूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान मोरे हा आपल्या परिवारासह पहूर पेठ येथील आंबेडकर नगरात वास्तव्याला होता. शनिवारी १२ ऑगस्ट रोजी साकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आनंद मोरे हा लोंढरी शिवारातील शेतात बेलाची पाने तोडण्यासाठी गेला होता. शेतात इलेक्ट्रीक खंब्यावरील तार तुटून पडलेली होती. सोबत त्याची मोठी बहिण आशाबाई मोरे, चुलत बहिण सारिका मोरे, शेलाबाई घोडेस्वार हे तिघेजण होते. सोबत असलेल्या आशाबाई मोरे याचा पाय तारेवर पडला. हे पाहून याने बहिणीला वाचविण्यासाठी विजेची तार हातात पकडली, तेवढ्यात वीजेचा धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार घडल्यानंतर आजूबाबच्या शेतातील शेतकऱ्यांनी धाव घेतली. त्याला तातडीने जामनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे.


Protected Content

Play sound