यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील तालुक्यातील डांभुर्णी येथील राहणारे व स्वयंदीप प्रतिष्ठानचे मार्गदर्शक व संदीप सोनवणे यांच्या परिवारातील त्यांचे मोठे बंधु दिनेश निंबाजीराव सोनवणे (पाटील) यांची पदोन्नती होऊन त्यांनी मुंबई येथील सीआयडीच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतल्या बद्दल दिनेश सोनवणे (पाटील) यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
दिनेश सोनवणे यांचा पोलीस प्रशासनातील कार्यकाळ हा अत्यंत रोमांचकारी राहीलेला आहे. त्यांनी प्रशासकीय सेवा बजावतांना अनेक जिकरीच्या व लक्ष वेधणाऱ्या कामगिऱ्या यशस्वी पार पाडल्या आहे. महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी सेवा बजावलेली आहे नुकतेच ते गोंदिया येथे कार्यरत होते .तेथून पदोन्नतीवर बदली होऊन ते आता देशाच्या आर्थिक राजधानीत सीआयडी सारख्या अत्यंत जबाबदार व महत्त्वाच्या पोलीस शाखेला सेवा देतील. त्यांनी पोलीस दलात केलेल्या चांगल्या कामगिरी मुळे स्वयंदीप प्रतिष्ठानने त्यांना युवा प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवले आहे.