मोदी मंत्रिमंडळातील मोठया नेत्याने दिला राजीनामा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात असणारे पशुपती पारस यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी १७ मार्च रोजी एनडीएमध्ये बिहारमधील लोकसभेच्या ४० मतदारसंघातील जागाचे वाटप करण्यात आले. भाजप, जेडीयू, एलजेपी (रामविलास), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि एचएएममध्ये जागा विभागल्या गेल्या. पण पशुपती कुमार पारस यांचा पक्ष राष्ट्रीय लोजपला यात एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे ते नाराज होते. एनडीएमध्ये माझ्यावर अन्याय झाला, असे ते म्हणाले; आता मी ठरवेन कुठे जायचे. अशातच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी १८ मार्च मंगळवार रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

भाजपने त्यांचे पुतणे चिराग पासवान यांना साथ दिल्यामुळे त्यांचे काका पशुपतीकुमार पारस यांच्याकडे दुर्लक्ष केले आहेत. ते २०१९ मध्ये हाजीपुर मतदारसंघातून लोकसभेला निवडून गेले होते आणि त्यानंतर त्यांना भाजपने मंत्रीपद दिले होते. पण आता सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते तेजस्वी यादव यांच्या आरजेडीच्या संपर्कात आहेत. हाजीपूरमधून ते लोकसभा निवडणूक लढवणारच आहेत, पण ती जागा आता भाजपने चिराग पासवान यांना दिली आहेत. भाजप आणि पशुपती पारस यांचा जागा न मिळाल्याचा वाद आहे अशी भूमिका जेडीयूचे नेते नीतीश कुमार यांनी घेतली आहे.

हाजीपूर जागेवरील दाव्याबाबत चिराग पासवान आपल्या काकांवर वरचढ असल्याचे दिसत होते. भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते चिरागच्या बाजूने सतत बोलत होते. काही महिन्यांपूर्वी सर्वकाही हळूहळू समोर येऊ लागले होते. एकीकडे चिराग गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेत होते, तर दुसरीकडे सम्राट चौधरी आणि मंगल पांडे हे नेते पशुपती कुमार पारस यांची भेट घेत होते. यावरून तुम्ही समजू शकता की किती मोठा फरक पडला होता. पशुपती कुमार पारस यांना काही राज्याचे राज्यपाल बनवण्याची ऑफर भाजपकडून देण्यात आली होती. जी त्यांनी फेटाळली होती.

Protected Content