युवासेनेच्या उपजिल्हाप्रमुखाने फोडला नगरसेवकाला घाम

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेत भाजपच्या एका गटाचे खाजगी विषयावरून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाशीसंबंधी अश्लील शिव्यांसाहित असलेल्या तक्रारीचा कागदाची गुरुवारी रात्री भुसावळच्या एका नगरसेवकाने पोस्ट टाकली होती. त्यावरून शिवसेना युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी आज सकाळी धरणगावच्या एका नगरसेवकाला शब्दांचा मार देत चांगला घाम फोडला. यानंतर येवले नामक नगरसेवकाला आपली चूक उमगली. रात्री थोडा कार्यक्रम होता भाऊ…त्यामुळे चूक झाली म्हणत माफी मागून नंतर दिलगिरी व्यक्त केली. दरम्यान, सोशल मिडीयावर व्यक्त होतांना लोकप्रतिनिधींनी भान ठेवले पाहिजे,अशी संतप्त चर्चा धरणगावसह धरणी परिसरातून सुरु आहे.

या संदर्भात अधिक असे की, खाजगी ले-आउटच्या मंजुरी संदर्भात भाजपचा एक गट पालिकेत आंदोलनाला बसला आहे. परंतु नियमबाह्य काम करण्यास पालिका मुख्याधिकारी यांनी विरोध दर्शविल्यामुळे सबंधितानी खोटे आरोप करायला सुरुवात केली असल्याची चर्चा पालिकेच्या आवारात सध्या सुरु आहे. अगदी वैयक्तिकरित्या कौटुंबिक पातळीवर जाऊन आज सकाळपासून सोशल मिडियावर आरोप सुरु आहेत. आंदोलनाच्या विषयाला अनुसरून भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांनी सोशल मिडीयावर तक्रारी अर्जाचा कागद टाकला होता. त्यात म्हटले होते की, धरणगाव मुख्याधिकारी यांनी आपल्याला अश्लील शिवीगाळ केली. अगदी त्या शिव्यांची नाव देखील दिसत होती. त्यावर शिवसेना युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश वाघ यांनी प्रतिक्रीया टाकली की, तुमच्या वयक्तिक वादाबद्दल मला काही माहित नाही. परंतु एक उच्चशिक्षित महिला अधिकारी अशा अश्लील शिव्या देईल,असं मला वाटत नाही. वाघ यांच्या प्रतिक्रियेवर धरणगावचे नगरसेवक ललित येवले यांनी एक अश्लील इमोजी पोस्ट केली आणि चमचोसे सावधान म्हटले. परंतु योगेश वाघ यांनी संयम ठेवत रात्री वाद वाढवला नाही. परंतु आज सकाळी भेट झाल्यानंतर मात्र, श्री.वाघ यांनी नगरसेवक येवले यांना चांगलेच धारेवर धरले. कोणतेही आंदोलन हे आपल्या जागी आहे. परंतु लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही सोशल मिडीयावर व्यक्त होताना संयम पाळला पाहिजे. तुम्हीच अशी भाषा वापराल तर, सर्वसामान्य धरणगावकर तुमच्यापासून काय आदर्श घेतील? असा प्रश्न श्री.वाघ यांनी उपस्थित केला. त्यावर आपली चूक लक्षात आल्याबरोबर नगरसेवक येवले हे श्री. वाघ यांच्या गयावया करू लागले. भाऊ मला तुम्ही प्रतिक्रिया दिली,हे लक्षात आले नाही. अन्यथा अशी चूक झाली नसती. यापुढे असं होणार नाही,दिलगिरी व्यक्त करतो म्हणत माफी मागितली. श्री. वाघ यांनी देखील विषय तेथेच आटोपता घेतला. दरम्यान, आंदोलन करणे, आपला हक्क मागणे हे घटनेने दिलेले अधिकार आहेत.परंतु आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कुणाच्या वैवाहिक जीवनाबद्दल आरोप करणे कित योग्य? किंवा अश्लील शिव्यांचा भरणा असलेल्या तक्रारींचा कागद सोशल मीडियात टाकणे, हे कितपत योग्य आहे? असा सवाल देखील श्री.वाघ यांनी उपस्थित केला आहे. एकंदरीत खुनशीप्रवृत्ती आणि घाणेरड्या राजकारणाचा प्रवेश धरणगावात होतोय का? हा प्रश्न देखील यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Add Comment

Protected Content