यावलमध्ये उदंड उत्साहात पार पडला जश्‍ने पेहरन-ए-शरीफ !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण राज्यात फक्त यावल येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा जश्‍ने पेहरन-ए-शरीफ हा उत्सव येथे आज अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

( Image Credit Source : Live Trends News )

महाराष्ट्र राज्यात एकमेव जळगाव जिल्ह्यातील यावल येथे साजरे होत असलेला मुस्लिम बांधवांचा जश्‍ने पेहरन-ए-शरीफ या वर्षात खिरनीपुरा उत्सव समितीच्या वतीने साजरा होत असून जश्‍ने पेहरन-ए-शरीफ ची मिरवणूक डांगपुरा या ठिकाणाहुन दुपारी चार वाजेला भक्ती गीताचे सुराने ( मिलादपार्टी) मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.

या वर्षात कोणतेही कर्णकर्कश ,डोल ताशे किंवा कठल्याही वाद्य शिवाय मिरवणुक काढण्याचा पंचकमीटीने निर्णय घेतल्याने डांगपुरा परिसरातुन पैरहन ए शरीफ डोलीच्या मिरवणुकीस दुपारी प्रारंभ झाला. राज्यात यावल येथेच एकमेव जश्‍ने पेहरन-ए-शरीफ साजरा केला जातो या उत्सवाला सुमारे १३० वर्षांची परंपरा आहे.उर्दू वर्षानुसार मोहरमच्या १४ तारखेला हा उत्सव साजरा करतात.जश्ने पैहरन ए शरीफ च्या काढण्यात येत असलेल्या डोलीचे चे हजारो भाविक दर्शन घेतात यासाठी मुंबई,खंडवा ,धुळे, मालेगाव, जळगाव बर्‍हाणपूर ,सुरत आदी शहरासह भाविक येथे उत्सवासाठी उपस्थित राहत असल्याने घरोघरी पाहुण्यांची वर्दळ दिसुन येत आहे.

या पैरहनच्या उत्सवात हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होवु पैरहनच्या डोलीचे या निमित्ताने हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकात्मतेचे दर्शन घेतांना दिसुन येत आहे. भाविकांसाठी लंगर ( प्रसाद )चे आयोजन लंगर कमिटीच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पैरहन पंचकमेटीच्या या वेळी चार क्विंटल तांदळाचा गोड भात करण्याचे आयोजन करण्यात आले. प्रसाद घेण्यासाठी शहरातील खिरनीपुरा परिसरातील नगीना मस्जिद चौकात भाविकांनी एकच गर्दी केली होती.

दरम्यान, जश्‍ने पेहरन-ए-शरीफ निमित्त तीन ऑगस्ट रोजी हिंदू मुस्लिम एकता समितीच्या वतीने येथील चोपडा रस्त्यावरील नदीपात्रात ३ ऑगस्ट गुरूवार रोजी चोपडा मार्गावरील नदीपात्रात भव्य कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असुन या कस्त्यांच्या खुल्या दंगल मध्ये बर्‍हाणपूर, चाळीसगाव, मनमाड, धुळे, भुसावळ, जळगाव मालेगाव, मेरठ (उतरप्रदेश )आदी ठीकाणाहुन दंगल मध्ये सदभागी होण्यासाठी कुस्तीपटू मोठ्या संख्येने हजेरी लावणार असल्याचे पहेरहन कमेटीच्या वतीने सांगण्यात आले आहे .

यावेळी कायदा सुव्यवस्था राखण्याकामी फैजपुर विभागाचे डीवायएसपी डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतीस निरिक्षक राकेश मानगावकर, सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद गोसावी , पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उप’ निरिक्षक सुनिल मोरे , पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर पठाण, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्यासह पोलीस कर्मचारी व गृहरक्षकदलाच्या कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

Protected Content