यावल महाविद्यालयात “राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दिष्टे व स्वयंसेवकांचे आचरण” विषयावर मार्गदर्शन

यावल प्रतिनिधी । येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज मर्यादित जळगाव संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना प्रबोधन वर्गाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. यावेळी डॉ.ए.पी.भंगाळे यांनी विद्यार्थ्यांना “राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे आणि स्वयंसेवकांचे आचरण” या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ.ए.पी. भंगाळे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले की, समाजाच्या सेवेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधणे हा हेतू समोर ठेवून राष्ट्रीय सेवा योजना देशात सुरू करण्यात आलेली आहे. युवकांमधील ऊर्जा विधायक कामासाठी वापरली जाऊन देशाचा विकास व्हावा, या उद्देशाने प्रत्येक महाविद्यालयात ही योजना राबविण्यात येते.

अध्यक्षीय भाषणात प्रा. ए.पी.पाटील यांनी प्रतिपादन केले की, राष्ट्रीय सेवा योजना ही व्यक्तिमत्त्व विकासाचे व्यासपीठ आहे. नैसर्गिक व मानवी आपत्तीत उस्फूर्तपणे समाजसेवा व देशसेवा करण्याची विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी प्राप्त होत असते. याप्रसंगी त्यांनी बोधचिन्हाची सविस्तर माहिती दिली. प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना एककाचे प्रमुख डॉ. आर. डी .पवार यांनी केले तर आभार डॉ. सुधा खराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुधीर कापडे, डॉ.पी.व्ही.पावरा, सुभाष कामडी, कासिम तडवी, शहारुख तडवी, सुचिता बडगुजर, युक्ती चौधरी व राजीक शहा यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास अनेक स्वयंसेवक प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

 

 

 

 

 

Protected Content