अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम पाटील कला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. संजय महाजन यांना कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हिंदी विषयाचे पीएच.डी गाईड म्हणून मान्यता मिळाली आहे.
प्रा. डॉ. संजय महाजन यांना पीएच.डी. गाईड म्हणून मान्यता मिळाल्याने अर्थातच यामुळे कळमसरांचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. प्रा.संजय महाजन यांना हिंदी विषय शिकवण्याचा तब्बल 21वर्षाचा अनुभव आहे. मारवड येथील कै. न्हानाभाऊ मन्साराम पाटील कला महाविद्यालयात हिंदी विभाग प्रमुख म्हणून काम करत आहे. पीएच.डी.चे मार्गदर्शक म्हणून ग्रामीण भागास प्रथमच असा बहुमान मिळत असल्याने याच्यात आवड असलेल्या अनेक नवयुवकांना याचा फायदा व प्रोत्साहन मिळणार आहे. ते कळमसरे येथील कळमसरे विद्या प्रसारक संस्थाचे कै. प्रल्हाद तोताराम महाजन संस्थापक उपाध्यक्ष यांचे ते लहान सुपुत्र तर शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक विकास प्रल्हाद महाजन यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्या यशाचे अभिनंदन मारवड संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षक, समाजबांधव तसेच मित्र परिवारा व आप्तेष्टच्या वतीने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .