काँग्रेसचे जोरदार आंदोलन : प्रमुख नेत्यांना अटक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महागाई व ईडीच्या गैरवापरासह केंद्र सरकारच्या कारभाराच्या विरोधात आज राष्ट्रव्यापी आंदोलन करण्यात येत असून राज्यात प्रमुख नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देशातली वाढती महागाई, बेरोजगारी याच्या विरोधात तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची ईडी चौकशी या सगळ्याच्या विरोधात कॉंग्रेसने राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, मुंबईतही पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय निरुपम तसंच माणिकराव ठाकरे, नितीन राऊत, अस्लम शेख यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, लवकरच राहुल गांधी यांचा राज्यात १६ दिवसांचा दौरा होतोय. सात लोकसभा मतदारसंघ व १५ विधानसभा मतदारसंघातून ते पदयात्रा काढणार असून त्या माध्यमातून ते थेट जनतेशी संवाद साधणार आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.