Home Cities अमळनेर जुन्या भांडणावरून तरूणाला बेदम मारहाण

जुन्या भांडणावरून तरूणाला बेदम मारहाण

0
52


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील आंचलवाडी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला गावातील ७ जणांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील आंचलवाडी गावात विकास उर्फ अविनाश ज्ञानचंद पाटील हा तरुण शेतातून बैलगाडी घेऊन खळ्यात आला. त्यावेळी रस्त्यावर उभे असलेल्या एका मुलीला बाजूला होण्याची सांगितले, दरम्यान विकास हा खळ्यात बैलगाडी सोडली. त्यावेळी मुलीला बाजूला सरकण्याचे सांगितल्याचा रागातून आणि जुन्या भांडणाच्या कारणावरून गावात राहणारे सुमनबाई प्रताप भिल, प्रताप रामा भिल, निर्मला प्रताप भिल, मुकेश राजू भिल, छोटू पैलवान, सुनील भिल, योगेश भिल सर्व रा. मोहाडी ता.जि.धुळे यांनी विकास उर्फ अविनाश पाटील याला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना घडल्यानंतर विकास पाटील याची आई विमलबाई ज्ञानचंद पाटील यांनी अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound