‘२० खोके एकदम ओके’च्या घोषणांनी ग. स. च्या सभेत गदारोळ (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स  न्यूज प्रतिनिधी | आज ग. स. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभेचे  सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. मात्र, सत्ताधाऱ्यांनी सभासदांचे काही एक ऐकून न घेता सभा आटोपती घेतल्याचा आरोप करत विरोधकांनी २० खोके एकदम ओके म्हणत गोंधळ घातला.

 

सहकार गटाची ग. स. वर सत्ता आल्यानंतर ही पहिलीच वार्षिक सर्वसाधारण होती. सभेची प्रस्तावना सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी केली. यावेळी आजी माजी संचालक तसेच सत्ताधारी व विरोधक व्यासपीठावर हजर होते. यात उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, संचालक अजबसिंग पाटील, क.नि.समितीचे अध्यक्ष अजय देशमुख, कर्ज समिती अध्यक्ष योगेश इंगळे, ग.स.प्रबोधनी अध्यक्ष मंगेश भोईटे, लोकसहकार गटाचे गटनेता सुनिल सुर्यवंशी, प्रगती शिक्षक सेना गटाचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, संचालक भाईदास पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, अनिल गायकवाड, विश्वास पाटील, महेश पाटील, प्रतिभा सुर्वे, रागिणी चव्हाण, अजयराव सोमवंशी, मनोज माळी, विजय पवार, निलेश पाटील, योगेश सनेर, अमरसिंग पवार,तज्ज्ञ संचालक जयश्री महाजन, राम पवार, व्यवस्थापक वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.

 

अध्यक्ष उदय पाटील यांच्या प्रस्तावनेनंतर सभासदांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. यावर अध्यक्ष उदय पाटील यांनी आधी विषय पत्रिकेवरील विषय संपल्यानंतर आयत्यावेळच्या विषयांवर  चर्चा करण्यात येईल असे जाहीर केले. मात्र, विषय पत्रिकेवरील शेवटच्या विषयाचे वाचन चालू असतांना सभासदांनी व्यासपीठावर चढून आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली असता विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आल्याने सभागृहात एक गोंधळ उडाला. यानंतर लागलीच राष्ट्रगीतास  प्रारंभ करण्यात आला. राष्ट्रगीत संपताच काही सभासदांनी २० खोके आणि सगळेच ओकेच्या घोषणा देवून सभागृह दणाणून सोडले होते. यावेळी त्यांनी यात सभासदांना बोलू न देता राष्ट्रगीत म्हणून सभा गुंडाळण्यात आल्याने याचा अतिशय तीव्र नाराजी व्यक्त केली. सत्ताधार्यांनी सभासदांचा विश्वासघात केला असून त्यांनी घोळ केला आहे. तर, राष्ट्रगीत आकस्मीक सुरू करून राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप देखील करण्यात आला.

 

यावेळी सभासदांनी  वर्गणीवरील १ टक्का व्याजदर कमी करायला नको होते. डिव्हीडंड १०  टक्के हवा ६ टक्के चालणार नाही असी भूमिका घेतली. सभासदांना कुठलाही विषय मांडू दिला नाही. वर्गणीचा व्याजदर १ टक्क्याने कमी केला. सभासद ज्या वेळेस बोलायला उठले त्यावेळी त्यांनी राष्ट्रगीत चालू करून दिले. त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याचा आरोप जामनेरचे सदस्य योगेश माणिकराव पाटील यांनी केला. ते पुढे म्हणाले की,  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्ताने राष्ट्रगीत गरजेचे नव्हते. परंतु, सभा उधळून लावण्यासाठीच राष्ट्रगीत चालू केले. सभासदांना बोलू दिले नाही. याचा आम्ही विरोध करतो. मयत सभासदांना संस्थेतर्फे अनुदान किंवा योजना दिल्या जात आहेत याला प्रत्येक वेळी सभासदासं का ? जबाबदार धरलं जात आहे.  तुम्ही सभासदांकडून किती पैसे लुबाडणार आहेत ? नफ्याची वाटणी कशी होते याची माहिती सभासदांना होत नाही अशी तक्रार देखील त्यांनी यावेळी केली. सत्ताधाऱ्यांनी ही सभा उधळून लावली आहे. सभासदांचे कुठलेही विषय मंजूर  केलेले नाहीत असा आरोप श्री. पाटील यांनी केला तर कन्यादान योजनेचा लाभ मुलींसोबत मुलांना देखील मिळाला पाहिजे अशी अपेक्षा दुसऱ्या सभासदाने  व्यक्त केली. दरम्यान, ग.स. सोसायटीचे अध्यक्ष उदय पाटील यांनी सर्व आरोप फेटाळू लावत कालच्या ग.स. च्या बैठकीत तिन्ही गटांचे संचालक एकत्र आले होते. त्यांनी एकत्र आल्याचा देखावा केला. तथापि, आज विरोधी संचालक आणि सदस्यांनी सभेत गोंधळ घालून आपला छुपा हेतू दाखवून दिला. यामुळे आजचा गोंधळ म्हणजे विरोधी गटाचा दुटप्पीपणा असल्याचा हल्लाबोल श्री. पाटील यांनी केला.

 

भाग १

भाग २

भाग 3

भाग ४

भाग ५

भाग ६

Protected Content