पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे. तसेच आजही पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचे लोकार्पण होणार आहे. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे भूमिपूजनही होणार होते. कालपासून पुण्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सभेच्या ठिकाणी प्रचंड चिखल झाला होता. त्यामुळे पर्यायी जागा म्हणून गणेश क्रीडा कला केंद्राच्या सभागृहात मोदींची सभा घेण्याचा विचार सुरु होता. मात्र, या सभागृहातील कार्यक्रम खुल्या मैदानाच्या तुलनेत लहानच होईल. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पुणे दौरा रद्द केल्याचे समजते. त्यामळे पुणे मेट्रोच्या सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला आहे.