मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | २४ सप्टेंबर २०२४ रोजी, कृषि महाविद्यालय मुक्ताईनगर राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले संकल्प पक्के करण्याबाबत व सामाजिक कार्यामध्ये योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे प्रा.विजय डांगे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात एनएसएसच्या महत्त्वपूर्ण कार्याची चर्चा केली. त्यांनी समाजासाठी नि:स्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा दिली आणि देशातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी एनएसएस सारख्या चळवळींची आवश्यकता स्पष्ट केली. प्रस्तावनेत रा. से. यो.कार्यक्रम अधिकारी. नामदेव धूर्वे यांनी राष्ट्रीय सेवा योजना ची पार्श्वभूमी विषद केली व स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले. या कार्यक्रमात सौरभ होनमाने,स्नेहल देसाई, नीलम कांबळे या स्वयंसेवकांनी मनोगत व्यक्त केले. .
एनएसएसच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवले जात आहेत, जसे की स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, शिबिरे इत्यादी. हा उत्सव विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावना वृद्धिंगत करण्यासाठी आणि समाजप्रती जबाबदारी वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरला. एनएसएस स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण राबवीली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमा प्रसंगी डॉ. जी. पी. देशमुख, डॉ. बी डी रोमाडे, डॉ. रियाज शेख, डॉ. रंगनाथ बागुल, डॉ.रमेश चौधरी, डॉ. मनीषा पालवे,डॉ.सागर बंड ई. प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी केकाने हिने तर आभार प्रदर्शन अभिलाषा पठारे हिने केली. कार्यक्रमाचा यशस्वीते साठी सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.कुशल ढाके”व रां.से. यों. स्वयं सेवकांनी परिश्रम घेतले समारोप राष्ट्रगीताने झाला. उपस्थित सर्वांनी राष्ट्रसेवेसाठी आपले योगदान देण्याचा दृढ निश्चय केला.