पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून दाखल केला उमेदवारी अर्ज

वाराणसी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी वाराणसीतून तिसऱ्यांदा उमेदवारी दाखल केली आहे. सकाळी पंतप्रधान मोदींनी सकाळी साढे नऊ वाजता गंगा पूजा केली आणि क्रूझने नमो घाटावर पोहोचले असता काशीतील कोतवाल नावाच्या कालभैरव मंदिरात दर्शन घेतले आणि आरती केली. त्यानंतर पंतप्रधानांनी वाराणसीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले आणि उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी दाखल करण्यासाठी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एलजेपी (आर) प्रमुख चिराग पासवान, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आरएलडी प्रमुख जयंत चौधरी, अभिनेता पवन कल्याण हे पंतप्रधानांच्या उपस्थित राहण्यासाठी पोहोचले आहेत. वाराणसीमध्ये लोकसभा निवडणूकीच्या शेवटच्या टप्प्यात १ जून रोजी मतदान होणार आहे.

Protected Content