“जामनेर पंचायत समितीमध्ये पैसे घेतल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही !” – प्रशांत पाटील यांचा आरोप

जामनेर प्रतिनिधी | ‘जामनेर पंचायत समितीमध्ये पैसे घेतल्याशिवाय लाभार्थ्यांचे काम होत नाही !’ असा आरोप करत “पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.” अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

“येथील पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून लाभार्थ्यांना आपले काम करण्यासाठी कागदावर वजन ठेवल्याशिवाय कोणते ही कामे होत नसून छोट्या कर्मचाऱ्याकडून लाभार्थ्यांकडून पैशाची वसुली केली जात आहे. त्यामुळे ‘पंचायत समिती’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.” अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केली आहे.

जामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी नेते डी.के. पाटील, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, काँग्रेसचे संजय राठोड आदी यावेळी उपस्थित होते.

“जामनेर पंचायत समिती हे भ्रष्टाचाराचे माहेरघर झाले असून प्रत्येक लाभार्थ्यांकडून टक्केवारी ठरलेली आहे, असे म्हणत, “गाय गोठा मंजूर करून वर्कऑर्डर काढण्यासाठी पाच हजार रुपये, सिंचन विहीरसाठी वीस हजार रुपये, ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालय बिल काढण्यासाठी पाचशे रुपये याप्रमाणे पैसे घेतले जात असून अधिकार्‍यांवर कोणत्याही प्रकारे वचक राहिलेला नाही.” असे सांगितले.

पत्रकार परिषदेत पुढे संवाद साधतांना, “गेल्या सहा महिन्यापूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’तर्फे जामनेर पंचायत समितीमधील अनेक बडे अधिकाऱ्यांच्या बदल्यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आश्वासन देऊन फक्त काही लोकांच्या बदल्या केल्या मात्र अनेक एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून पैसे दिल्यानंतरच कोणतेही कामकाज केले जाते. तर या पंचायत समितीचेमध्ये वरिष्ठ अधिकारी हे फक्त कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पैसा घेऊनच कोणतेही लाभार्थ्याच्या प्रकरणावर सह्या करतात. त्यामुळे गेल्या दोन दिवसापूर्वी एका कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली आहे. या दिवशी तक्रारदार हे आधी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनातून निघाले असल्याची माहिती मिळत असून अशाप्रकारे जर या पंचायत समितीमध्ये पूर्ण भ्रष्टाचार चालत असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आधी कारवाई करावी.” अशी मागणी पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी केली आहे

Protected Content