Home राजकीय सत्ताधारी आमदारांचे अशोभनीय वर्तन – सुप्रियाताई सुळे

सत्ताधारी आमदारांचे अशोभनीय वर्तन – सुप्रियाताई सुळे

0
52


मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.

शिंदे गटाचे आमदार महाराष्ट्राच्या विधानभवन परिसरामध्ये खुलेआम महाविकास आघाडीच्या आमदारांच्याबाबत हिंसक वक्तव्य करुन त्यांना धमकावण्याचे काम करत असल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या ही घटना निदर्शनास आणून दिली आहे.

भाजपासोबत युती करुन सरकार चालवणार्‍या लोकांचे हे वर्तन आणि प्रतिक्रियांवर तुम्ही कारवाई करा आणि महाविकास आघाडीच्या आमदारांना शिंदे गटाच्या लोकांकडून असलेला धोका लक्षात घेता झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी विनंती खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन केली आहे.


Protected Content

Play sound