Home Cities जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
56


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | निसर्गकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची जयंती आज बहिणाबाई उद्यान येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

 

लेवा गणबोली साहित्य मंडळ तसेच लेवा पाटीदार युवक मंडळ आणि बहिणाई ब्रिगेड या संस्थेतर्फे जयंती साजरी करण्यात आली. बहिणाबाईंच्या पुतळ्याची अवस्था अत्यंत बिकट झाली होती, याबद्दल साहित्य प्रेमींनी अनेक तक्रारी आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे केल्या होत्या ,त्याची तात्काळ दखल घेण्यात आली.

आमदार राजूमामा भोळे यांच्यावतीने बहिणाबाई उद्यानातील पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात आल्याबद्दल साहित्यिकांनी समाधान व्यक्त केले आणि अभिनंदन केले. कार्यक्रमाला महापालिकेचे प्रथम महापौर आशाताई कोल्हे , माजी महापौर सीमाताई भोळे ,कवी व कलावंत तुषार वाघुळदे , साधना लोखंडे, सुनीता नारखेडे, प्रदीप भोळे , डॉ. वीरन खडके आदींनी माल्यार्पण केले.

 


Protected Content

Play sound