बंडखोर आमदार पक्षश्रेष्ठींची माफी मागून परत येऊ शकतात : अशोक गेहलोत

जयपूर (वृत्तसंस्था) बंडखोर झालेल्यांना ठेवलेल्या अटी तुम्ही सर्वजण पाहू शकता. जर त्यांना परत यायचं असेल तर ते पक्षश्रेष्ठींची माफी मागू शकतात. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत बोलताना केले आहे.

 

 

पक्षश्रेष्ठींची माफी मागून पुन्हा ते पक्षात येऊ शकतात, अशी ऑफर काँग्रसेचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, असेही अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. दरम्यान, दरम्यान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी तिसऱ्यांदा ३१ जुलै रोजी अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. गेहलोत सरकारने मंगळवारी अधिवेशन बोलावले जावे अशी मागणी करणारा प्रस्ताव तिसऱ्यांदा राज्यपालांकडे पाठवला होता.

Protected Content