नंदिनीबाई विद्यालयाचा निकाल १०० टक्के; महेश्वरी नारखेडे अव्वल

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालयाचा एसएससी परीक्षा मार्च २०२० चा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. नारखेडे महेश्वरी दीपक ९९.६० टक्के मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे.

नंदनीबाई शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. यात नारखेडे महेश्वरी दीपक ९९.६० टक्के, द्वितीय प्रांजल जगताप ९७.६९टक्के, तृतीय क्रमांक पाटील कृतिका रवींद्र ९७.००टक्के, शिपी श्रुती रवींद्र ९६.८० टक्के, पाटील रिया संदीप ९६.४०टक्के, कुरकुरे हर्षा दिनकर ९३.२० टक्के, गव्हाणे अश्विनी मनोहर ९५.६०टक्के, व्यास कल्याणी हितेश ९५.४०टक्के, तसेच ९० टक्केच्या वर ३१ विद्यार्थिनी असून ८०टक्केच्या वर ८६ विद्यार्थिनी आहेत.

गणित विषयात १०० पैकी १०० दोन तर संस्कृत विषयात १०० पैकी १०० सहा विदयार्थिनी आहेत. यशस्वी झालेल्या विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष भास्कर चौधरी, उपाध्यक्ष अरुण श्रीपत नारखेडे, सचिव नीलकंठ शंकर पाटील, सहसचिव डॉ. डी.के. टोके व सर्व मुख्याध्यापिका चारुलता पाटील, उपमुख्याध्यापक एन.व्ही.महाजन, उपप्राचार्या एस.एस.नेमाडे, पर्यावेक्षक पी.व्ही.वाणी, पर्यावेक्षक कार्यालय प्रमुख श्रीमती गुळवे यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content