अमळनेर येथे महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ मोटरसायकल रॅली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगांव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताउदय वाघ यांचा प्रचारार्थ अमळनेर शहरात महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच समर्थक यांच्या उपस्थितीत प्रचंड अशी भव्य अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
ही रॅली आज सकाळी आठ वाजता श्री मंगळदेव ग्रह मंदिर पासून सुरू झाली होती. यावेळी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांच्या सोबत, मंत्री व अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटी हे देखील उपस्थित होते. या रॅलीला अमळनेर शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Protected Content