शांतीगिरी महाराज यांचा जाहीरनामा प्रसिध्द

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज ११ मे रोजी आज लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. कुशल प्रशासक श्रीरामांना वंदन करून आणि शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शांतीगिरी महाराज म्हणाले की, नाशिकमध्ये भगवे वादळ आले आहे. निवडणुकीत वचननामा सादर करत आहे. हा फक्त माझा नाही, संपूर्ण जय बाबाजी भक्त परिवाराचा वचननामा आहे. संसद भवन जसे आहे तसे खासदार भवन करणार आहोत. त्यात सगळे कक्ष असतील. जी समस्या तिथं येईल ती आम्ही सोडवू. आम्ही काही गोष्टी न बोलता करून दाखवू. आगळे वेगळे काम आम्ही करून दाखवू. गोदावरी नदी स्वच्छ करणार, स्नान करता आलं पाहिजे अशी गोदावरी नदी करणार आहोत. अयोध्येत जसे राम मंदिर झाले, त्यासाठी संन्यासी योगी आदित्यनाथ यांना विराजमान व्हावे लागले. लढा राष्ट्रहिताचा संकल्प शुद्ध राजकारणाचा हा आमचा नारा आहे. जे बोलणार ते करणार, जे करणार तेच बोलणार असा आमचा संकल्प आहे. आम्हाला खात्री आहे की, राजकारणाच्या माध्यमातून जनतेचे ऋण आम्ही फेडणार आहोत.

आपल्या नाशिकमध्ये अंजनेरी गड येथे हनुमान जन्मभूमी साकारणार आहोत. अयोध्येप्रमाणे आम्ही विकास करणार आहोत. बेरोजगारी, सेंद्रिय खतांचा कारखाना उभारणार आहोत. नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन करणार आहोत. मेट्रो करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल. पुणे, मुंबई या शहरांना जोडण्यासाठी भर असेल. आयटी पार्क पूर्ण करणार आहोत. शांतीगिरी महाराज खासदार झाल्यावर पगार घेणार नाहीत. तो पगार जनसेवेसाठी वापरतील. आमच्याकडे कोणत्याही टक्केवारीला थारा राहणार नाही. गुरुकुल पद्धतीचे शिक्षण सुरू केले जाईल, पैसे कमावण्याचा त्यात हेतू नाही. संस्कार त्या गुरुकुलमध्ये दिले जाईल. कुंभमेळ्यासाठी आम्ही चोख पद्धतीने नियोजन करू. नाशिक-पुणे रेल्वे सेवा सुरु करू. आमच्या गुरूंनी दिलेला उपदेश आहे. बोलून दाखवणार नाही करून दाखवणार आहोत.

 

Protected Content