नूतन मराठा महाविद्यालयामध्ये लघुकथेचे सादरीकरण

जळगाव प्रतिनिधी- येथील नूतन मराठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने ‘लक्ष्मी’ या नितीन चंदनशिवे लिखित लघुकथेचे नाट्यरूपांतर करून सादरीकरण करण्यात आले. 

यंदाच्या शैक्षणिक वर्ष २०२० – २१ मध्ये नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी दोन महिन्याच्या प्रशिक्षणानंतर स्वतः नाटक बसवायला घेतले. या सर्व प्रकियेमध्ये विद्यार्थ्यांनी कुठल्याही तज्ञाची मदत घेतली नाही. विद्यार्थ्यांनी ‘लक्ष्मी’ हे नाटक बसवून प्रभावी सादरीकरण केले. यावेळी जेष्ठ रंगकर्मी चिंतामण पाटील, पियुष रावळ, प्राचार्य. एल. पी देशमुख, उपप्राचार्य एन.जे पाटील, डी.आर चव्हाण, अफाक शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती. हा प्रयोग सामाजिक अंतर पाळून सादर झाला.

या लघुकथेचे नाट्यरूपांतर विद्यार्थी लेखक रोहन काटे यांनी केले. तसेच दिग्दर्शन विद्यार्थिनी किन्नरी जोशी हिने केले. सदर एकांकिका ही भुतदयेविषयी करुणामय असल्याचा संदेश देते. एकांकिकेचे मेंटरिंग प्रा. राहुल संदानशीव, हनुमान सुरवसे यांनी केले. नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की, “आपल्या चुका स्वीकारा व प्रशंसेने भारावून जाऊ नका. कारण एका कलाकारासाठी प्रशंसा ही श्राप ठरू शकतो ” विद्यार्थ्यांमध्ये या प्रात्यक्षिक सादरीकरणाने नवीन नाट्यकृती निर्माण करण्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. एकांकिकेतील सर्वच विद्यार्थी नवीन होते. मात्र त्यांच्या चपखल अभिनयाने उपस्थितांचे मन जिंकून घेतले. 

या एकांकिकेमध्ये आबा – श्रीकांत चौधरी, आत्या – राजश्री मनोहर, अण्णा – रोहन काटे, शामु – संजय कासार, लक्ष्या – प्रसाद कांबळे, सरला – किन्नरी जोशी, नितीन – हेमंत माळी, पप्पू – सोहम परणकर, बँकर – हर्षल वानखेडे, विक्रेता – यश गोडसे, यांनी भूमिका केल्या. तर रंगभूषा – हनुमान सुरवसे, वेशभूषा – सुनील परदेशी, प्रकाशयोजना – हर्षल परदेशी, प्रथमेश जोशी, नैपथ्य – धनराज सानप, राहुल सोनवणे, पार्श्व संगीत – प्रेम बडगुजर, सोहम परणकर यांनी एकांकिका प्रभावी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Protected Content