विष प्राशन करून विवाहितेची आत्महत्या

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील महेलखेडी-कोरपावली येथील विवाहितेने घरगुती भांडणावरून गुरुवारी दुपारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. या

वल तालुक्यातील महेलखेडी कोरपावली येथील रहिवासी विवाहित नजमा कासम तडवी (वय-३०) हिने गुरुवारी आपल्या राहत्या घरात कुटुंबाशी झालेल्या भांडणानंतर संतापाच्या भरात विष प्राशन केले. तिला तात्काळ कुटुंबीयांनी पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिचा दि.शुक्रवारी २० रोजी उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. मयत नजमा तडवी या महिलेच्या पश्चात एक सहा वर्षीय मुलगी आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात यावल पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!