महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

शेअर करा !

यावल प्रतिनीधी- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साकळी येथील शाखाप्रमुख संतोष सुरेश महाजन व कार्यकर्ते प्रविण पुंडलिक माळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेची यावल तालुक्याची बैठक दि २० रोजी यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी हा प्रवेश सोहळा पार पडला.राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दोघा कार्यकर्त्यांंचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तुषार(मुन्ना)पाटील,तालुकाप्रमुख रवि सोनवणे, गोपाळ चौधरी, यावलच्या माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा कोळी, शिवसेनेचे शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, सेनेचे साकळी- दहिगाव गटाचे गटप्रमूख महेंद्र चौधरी यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!