प्रशांत किशोर घेणार शरद पवारांची भेट

मुंबई प्रतिनिधी । ख्यातनाम रणनितीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेणार असून अलीकडच्या घटनांच्या पार्श्‍वभूमिवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांनी पश्‍चीम बंगालमध्ये ममत बॅनर्जी तर तामिळनाडूत एम.के. स्टालीन यांना सत्तारूढ करण्यात महत्वाचा वाटा उचलला होता. विशेष करून पश्‍चीम बंगालमध्ये अटितटीची लढत अपेक्षित असतांना ममतांनी अगदी एकतर्फी मिळवलेल्या विजयात प्रशांत किशोर यांच्या कुशल रणनितीचे योगदान असल्याचे मानले जाते. यातच पश्‍चीम बंगालमधील निवडणुकीनंतर त्यांनी रणनितीकार म्हणून कोणतीही कामे न घेण्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमिवर प्रशांत किशोर हे सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांची भेट घेत आहेत.

प्रशांत किशोर यांनी गत विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी सल्लागाराची भूमिका बजावली होती. महाविकास आघाडीच्या निर्मितीतही त्यांचे मत महत्वाचे ठरले होते. यामुळे आज ते शरद पवार यांची भेट घेत आहेत. सध्या राज्य सरकारमध्ये विसंवादाचे वातावरण असले तरी पवार यांनी कालच शिवसेनेसोबत दीर्घ मैत्रीचे संकेत दिले असतांना आज प्रशांत किशोर यांची भेट घेणे महत्वाचे मानले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.