अ.भा. मीणा समाज महासभा युवक जिल्हाध्यक्षपदी गोपाल चन्नावत

पाचोरा प्रतिनिधी । येथील गोपाल चन्नावत यांची अखील भारतीय मीणा समाज महासभेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, अखिल भारतीय मीणा समाज महासभा या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्हा युवक कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यात येथील गोपाल चन्नावत यांची अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघटनेच्या जळगाव जिल्हा युवक अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय मीणा समाज महासभा संघठन मजबूत करण्यासाठी गोपाल चन्नावत यांच्या नैतृत्वाचा अनुभव व मार्गदर्शनाचा सर्व जिल्ह्यातील गावा – गावात शाखा सुरू करण्याकरिता योग्य उपयोग होईल. त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक अध्यक्ष नाहरसिंग सत्तावन, मोहरसिंग सत्तावन, प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ, सुभाष डोभाल, पदमसिंग राजरवाळ, राम उसारे, दिपक डोभाळ, गोकुळ चेडवाळ, कैलास टाटू, विजयसिंग कायटे, प्रभाकर सुलाने, सरदारसिंग लकवाळ, भिमसिंग घुसिंगे, शंकर जोनवाळ दिपक शेवाळ यांनी अभिनंदन करुन यांचा सत्कार करण्यात आला. गोपाल चन्नावत यांच्या निवडीबद्दल सर्वत्र समाज बांधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.