पहिला विवाह लपून दुसरीशी घरोबा; वरून अत्याचार !

चाळीसगाव प्रतिनिधी । आधीच विवाहित असतांना ही माहिती दडवून दुसरीशी घरोबा थाटणार्‍याने दुसर्‍या पत्नीचा छळ केल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील उंबरखेड येथे विकास सुरेश केदारे हा वास्तव्यास आहे. त्याने आधीच विवाह केला असला तरी ही माहिती लपवून ३० मार्च २०२१ रोजी दुसर्‍या तरूणीशी विवाह केला. पुर्वीच्या लग्नाची भनक न लागू देता
पतीसह सासरच्यांनी सुरवातीला चांगली वागणूक दिली. मात्र काही दिवस उलटल्यानंतर तुझ्या आईवडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत त्या तरूणीचा छळ सुरू झाला.

या विवाहितेला पती विकास सुरेश केदारे, सासू रेखा सुरेश केदारे व नणंद पुजा सुरेश केदारे आदींकडून दररोज शारीरिक व मानसिक छळवणूक केली जात असे. त्याचबरोबर पैशाची व्यवस्था झाली नाही तर फारकती घेऊन मोकळी हो अशी धमकीही तिला दिली जात असे. शेवटी कंटाळून या विवाहितेने मेहूणबारे पोलिस स्थानक गाठून पतीसह सासरच्यांविरूध्द भादंवि कलम- ३७७, ४९८ (अ), ४९५, २९४, ४१७, ३२३, ५०६, ५००, ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील तपास पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार सुभाष पाटील हे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.