Home धर्म-समाज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची नियुक्ती

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप पाटील यांची नियुक्ती

0
119

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराला बळ देण्यासाठी जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदी प्रदीप भिकनराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कारही करण्यात आला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद जाधव, विभागीय अध्यक्ष चंद्रकांत बनकर, जिल्हा युवक अध्यक्ष व्यंकट मोरे आणि उत्तर महाराष्ट्र प्रमुख नानासाहेब बाच्छाव यांच्या हस्ते प्रदीप भिकनराव पाटील यांना जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संघटनात्मक जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख हरिभाऊ तुकाराम पाटील, जिल्हा संघटक प्रा. राकेश सोनवणे, भडगाव तालुका कार्याध्यक्ष चेतन पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संघटनेच्या बळकटीसाठी आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांना अधिक गती देण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांनी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

प्रदीप पाटील यांच्या नियुक्तीनंतर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यामध्ये अमोल शिंदे, माजी आमदार दिलीप वाघ, प्रताप पाटील, वैशाली सूर्यवंशी, प्रशांत पवार, सोमनाथ पाटील, विनोद नेरकर, देविदास पाटील, अनिल वाघ, सचिन चोरडिया, जितू पाटील, धनराज पाटील, योगेश शेलार, डॉ. पूनम पाटील, नूतन पाटील, योजना पाटील, योगिता वाघ, कुणाल पाटील आणि निलेश पाटील यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. संघटनेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे, संघटनात्मक विस्ताराला चालना देणे आणि समाजहिताचे विविध उपक्रम राबविणे, यासाठी नव्या जबाबदारीत सक्रियपणे कार्य करणार असल्याची भावना प्रदीप पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.


Protected Content

Play sound