पंतप्रधान पीक विमा योजना; केंद्र सरकारकडून मुदतवाढ

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑनलाईन फार्म भरतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत राज्यातील शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ३ ऑगस्ट पर्यंत देण्यात आली आहे. पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.

 

सरकारच्या या योजनेतून केवळ एक रुपयांमध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येतो. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पार पडते. पण गेल्या अनेक दिवसांपासून पिक विमा उतरवताना शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. गेल्या काही दिवसांपासून पिक विमा भरण्यासाठी सरकारची वेबसाईट योग्यप्रकारे चालत नसल्यानं शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक जिल्ह्यातील शेतकरी सीएससी सेंटरवर पिक विमा अर्ज भरण्यासाठी चकरा मारत होते, पण ऑनलाईन फॉर्म भरताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.  त्यामुळे पिक विम्यासंदर्भातील राज्य सरकारच्या विनंतीला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे.  पिक विमा भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख असून या तारखेच्या आत शेतकऱ्यांना पिक विमा भरावा लागणार होता. त्यामुळे मुदतीच्या आत पिक विमा भरणं शेतकऱ्यांपुढे मोठे आवाहन होते.

Protected Content