कोरोनातून बऱ्या झालेल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात त्रास

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनातून रिकव्हर झालेल्या स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात प्रचंड त्रास झाला आहे. बर्‍याच काळापासून कोरोनामुळे त्रस्त असलेल्या महिलांमध्ये मासिक पाळी संबंधित समस्यांमध्ये गुंतागुंत अधिक वाढली आहे

स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर देखील याचा प्रभाव पडला आहे. मासिक पाळीच्या समस्येतदेखील गुंतागुंत निर्माण झाली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या स्त्रियांमध्ये मानसिक ताण आणि तणावपूर्ण जीवन यासारख्या समस्या देखील समोर आल्या आहेत.

कोरोनामधून बरे झाल्यानंतर काही स्त्रियांना मासिक पाळीत अनियमिततेची समस्या उद्भवली आहे. काही स्त्रियांना मासिक पाळी आलीच नाही, तर काहींना जास्त रक्तस्त्राव आणि वेदनांना सामोरे जावे लागले आहे. काही महिलांना रक्ताच्या गाठी आणि मूड स्विंग्ससारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

तज्ज्ञांनी म्हटले आहे की, कोरोनाचा थेट मासिक पाळीशी काहीही संबंध नाही. त्याऐवजी, त्यांच्यात कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या तणावामुळे त्यांना हार्मोनल समस्या उद्भवल्या असून, त्यामुळेच मासिक पाळीचा त्रास निर्माण झाला आहे,काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोना विषाणूमुळे महिलांच्या अंडाशयांवर देखील परिणाम होतो आहे. परंतु, जसजसे कोव्हिडमधून शरीर सावरण्यास सुरुवात होते, तसतसे सर्व समस्या देखील हळू हळू सुरू होत आहेत

जेव्हा पिरियड्स येणार असतील, त्यापूर्वी एक आठवडा मनुके आणि केसर पाण्यात भिजवून खावेत. दररोज मोड आलेले कडधान्य उकडून खा किंवा एक फळ खा. आठवड्याला कमीत कमी दोनदा कंदमूळ म्हणजे रताळे किंवा सूरण खा. आठवड्याला किमान 150 मिनिटे व्यायाम करा. पीरियड्सदरम्यान रात्री झोपण्यापूर्वी कॅल्शियम सप्लीमेंट घ्या. पिरियड्सदरम्यान कोमट पाण्याची पिशवी पोटाजवळ ठेवावी.

दरम्यान, मासिक पाळीमुळे उद्भवणारा पीसीओडी हा आजार नियंत्रित केला जाऊ शकतो. यासाठी जीवनशैलीत सुधारणा होणे महत्त्वाचे आहे. यासाठी हाय कोलेस्ट्रॉल, हाय फॅट आणि हाय कार्बोहायड्रेट युक्त आहार टाळा. दररोज एक तास नियमित व्यायाम करा. यामुळे वजन नियंत्रित राहील. डॉक्टरांनी काही औषधे दिली असतील तर, ती वेळेवर घ्या. याद्वारे पीसीओडीची समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.

Protected Content