मुख्यमंत्र्यांचा भाचा एका रात्रीत उडवतो ८ कोटी रूपये

PURI

 

नवी दिल्ली वृत्तसंस्था । मध्ये प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा भाचा रतुल पुरी याच्यावर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे की, रतुल पुरीने अमेरिकेतील नाइटक्लबमध्ये एका रात्रीत ११ लाख डॉलर म्हणजेच ७.८ कोटी रुपये उडविले आहेत. याशिवाय, रतुल पुरीचे सहकारी आणि मोजरबेअर इंडिया कंपनीचे नाव सुद्धा या आरोपपत्रात आहे.

ईडीने रतुल पुरी याच्या विरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, रतुल पुरी परदेशातील अनेक हॉटेलांमध्ये थांबला होता हे त्याने केलेल्या पैशांच्या व्यवहारांची पडताळणी करण्यात आल्यानंतर स्पष्ट झाले आहे. या दरम्यान अमेरिकेतील प्रोव्होकेटर नावाच्या एका नाइट क्लबमध्ये एकाच रात्री ७ कोटी ८ लाख रुपये उडवल्याचे निष्पन्न झाले आहे. या बरोबरच नोव्हेंबर २०११ आणि ऑक्टोबर २०१६ च्या दरम्यान पुरीने स्वत:च्या मौजमजेसाठी सुमारे ३२ कोटी रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपपत्रात नमूद केलेल्या माहितीनुसार, पुरीने मनी लाँड्रिंगमध्ये सुमारे ८ हजार कोटी रुपयांचा व्यवहार केला आहे. मोजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आपल्या कंपन्यांकडे वळती केल्याचा दावा ईडीने केला आहे. या व्यवहारासाठीच बनावट कंपन्या बनवल्या गेल्या. पैसे वळते करण्यात आलेल्या अशा १२ कपन्यांच्या नावांचा उल्लेख ईडीने आरोपपत्रात केला आहे.

Protected Content