आसाम आणि पुद्दुचेरीतच भाजप यशस्वी

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  विधानसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये भाजपने मोठी मुसंडी मारली आहे, आसाममध्ये सत्ता राखली, तर पुद्दुचेरीत भाजप सत्तेत येण्याची चिन्हं आहेत तामिळनाडू-केरळात मात्र टफ फाईट आहे. अशावेळी पाच राज्यांतील भाजपच्या बड्या चेहऱ्यांचं नेमकं काय झालं? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

 

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना आसाममधील मजुली मतदारसंघातून मोठी लीड मिळाली आहे. भाजप उमेदवार सोनोवाल यांनी काँग्रेसच्या राजीव पेगू यांना मोठ्या मताधिक्याने मागे टाकले

 

भाजप आमदार हिमंता बिस्व सर्मा यांना आसाममधील जलुकबारी मतदारसंघातून मोठी आघाडी मिळाली  काँग्रेसच्या रोमेन बोरठाकूर यांनी सर्मांचा नऊ हजारांच्या मताधिक्याने पराभव करण्याचा दावा केला होता, प्रत्यक्षात उलटं चित्र दिसत आहे.

 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दंड थोपटणारे तृणमूलचेच माजी आमदार सुवेंद्रू अधिकारी आता भाजपच्या तिकीटावर नंदिग्राममधून मैदानात आहेत. अधिकारी बॅनर्जींना कडवी झुंज देत आहेत. सुरुवातीच्या कलानुसार ममतादीदी पिछाडीवर असून अधिकारींना किमान चार हजारांची आघाडी आहे.

 

भाजप उमेदवार स्वपन दासगुप्ता तारकेश्वर मतदारसंघातून पराभवाच्या छायेत आहेत. तृणमूलच्या रामेंदू सिंहराय यांनी दासगुप्तांना मागे टाकले आहे.

 

कृष्णानगर उत्तर मतदारसंघातून भाजप उमेदवार मुकुल रॉय तृणमूलच्या कौशनी मुखर्जी यांना मागे टाकून भक्कम आघाडीवर आहेत.

 

केंद्रीय मंत्री आणि पार्श्वगायक बाबुल सुप्रियो हे टॉलिगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या अरुप विश्वास यांच्याविरोधात रिंगणात उतरले आहेत. मात्र सुप्रियोंना मताधिक्य मोडण्यासाठी मोठी लीड घ्यावी लागेल

 

प्रख्यात अर्थतज्ज्ञ अशोक कुमार लाहिरी हे भाजपच्या तिकीटावर तृणमूलच्या शेखर दासगुप्ता यांच्याविरोधात बालूरघाट मतदारसंघात उतरले आहेत. लाहिरींनी दासगुप्तांना मागे टाकले आहे

 

मेट्रोमॅन अशी ख्याती असलेले भाजप उमेदवार ई श्रीधरन केरळातील पलक्कड मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परंबील यांना श्रीधरननी पिछाडीवर सोडले आहे.

 

तामिळनाडूतील अरवाकुरिची मतदारसंघातील भाजप उमेदवार आयएएस ऑफिसर अन्नमलाई  अल्पशा मतांनी पिछाडीवर आहेत. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या अन्नमलाईंनी प्रचारात स्वतःला झोकून दिलं होतं. मात्र द्रमुक उमेदवार ईलांगो आर यांनी त्यांना मागे टाकलं.

Protected Content