एकत्र काम करू ; शरद पवारांचे सूचक संकेत

मुंबई: वृत्तसंस्था ।  पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी  यांनी भाजपला धूळ चारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरवर   प्रतिक्रिया दिली या विजयासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. आपण भविष्यात लोकांसाठी एकत्र काम सुरु ठेवुयात. कोरोनाच्या संकटाचाही मिळून मुकाबला करु, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

संपूर्ण देशाचे लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी  यांचा तृणमूल काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार, असे संकेत मिळत आहेत. सध्याच्या आकेडवारीनुसार, तृणमूल काँग्रेस 204 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 86 जागांवर आघाडीवर आहे.

आतापर्यंतच्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर ‘अब की बार 200 पार’च्या वल्गना करणारा भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. कोरोनामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथरित्या सुरु आहे. त्यामुळे निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

शरद पवार हे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात ममता बॅनर्जी यांचा प्रचार करणार होते. प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. मात्र, ही विनंती डावलून शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांच्या मदतीला जाण्याचे ठरवले होते.

मात्र, अचानक शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यामुळे शरद पवार यांचा पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्यात आला होता.

Protected Content