दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सन २०२३ करिता नामांकन व अर्जासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या https://awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे. राष्ट्रीय पुरस्काराकरीता अर्ज, नामांकने केवळ गृह मंत्रालयाने तयार केलेल्या संकेतस्थळावर सादर करावेत. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरण्यात यावी. समक्ष अथवा टपालाद्वारे सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

 

अर्जदारांसाठी पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील https://disabilityaffairs.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येणार आहेत, असे ही श्री.रायसिंग यांनी कळविले आहे.

Protected Content