जनमत प्रतिष्ठानकडून जाहीर सूचना फलक

 

 

जळगाव : प्रतिनिधी । आज (दिनांक 25 ) जनमत प्रतिष्ठानकडून फुले मार्केट सारख्या गजबजलेल्या भागात मास्क लावा सुरक्षित अंतर ठेवा व वारंवार हात स्वच्छता धुवा असे फलक जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले यांच्याकडून लावण्यात आले.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत असल्याने लोकांनी पूर्वीसारखीच काळजी घेणे महत्वाचे आहे , गाफील किंवा निर्धास्त राहू नये . प्रशासन , पोलीस आणि आरोग्य खात्याच्या प्रयत्नांना साथ द्यावी . या आजाराला उपचार नसल्याने प्रतिबंध हाच प्रभावी उपाय आहे . हे वास्तव लोकांनी गांभीर्याने लक्षात घ्यावे या उद्देशाने हे फलक लावले आहेत , असे पंकज नाले यांनी सांगितले

Protected Content