कार्ड इन्शूरन्स देण्याच्या नावाखाली शिक्षिकेची ११ हजाराची ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुक्ताईनगर परिसरातील शिक्षिकेची स्टेट बॅकेचे क्रेडीड कार्ड बंद करून क्रेडीट कार्ड इन्शुरन्स करुन देण्याच्या नावाने 11 हजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मुक्ताईनगर परिसरात गट नं 35 येथे भाग्यश्री साहेबराव पाटील वय 28 या वास्तव्यास आहेत. त्या शिक्षिका म्हणून नोकरीला आहेत. मंगळवारी भाग्यश्री पाटील यांना त्यांच्या मोबाईलवर एका जणाचा फोन आला. त्याने स्टेट बँकेतून बोलत असून तुमचे स्टेट बँकेचे कार्ड डीअ‍ॅक्टीवेशन करुन त्याचे क्रेडीट कार्ड इन्श्युरन्समध्ये रुपांतर करावयाचे असल्याचे सांगितले. यासाठी मोबाईल एक लिंक पाठविण्यात येईल असेही तो म्हणाला. त्यानुसार भाग्यश्री पाटील यांना त्याच्या मोबाईलवर काही वेळात एक लिंक आली. त्या लिंकवर क्लिक केल्यावर ओटीपी क्रमांक मिळाला. हा ओटीपी क्रमांक फोन करणार्‍या अनोळखी व्यक्तीला सांगताच, भाग्यश्री पाटील यांच्या बँकेच्या खात्यातून 11 हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाईल वर प्राप्त झाला. फोनवर बोलणार्‍या अनोळखी व्यक्तीने आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची खात्री झाल्यावर भाग्यश्री पाटील यांनी तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. या तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक विलास शेंडे हे करीत आहेत.

Protected Content