जळगावात तरूणाची दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव प्रतिनिधी । शहरातील हॉटेल रामा इन येथे जेवनाचे पार्सल घेण्यासाठी आलेल्या तरूणाची दुचाकी लंपास केल्याची घटना आज सकाळी घडली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, विवेक शांताराम पाटील (वय-३५) रा. अमोघा हाईट्स, कोल्हे नगर हे कुटुंबियासह वास्तव्याला आहे. आज सकाळी ८.४५ वाजेच्या सुमारास रिंगरोडवरील हॉटेल रामा इन येथे होन्डा ॲक्टीवा (एमएच ४१ एस ९१४७) वाहनाने जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले. हॉटेल समोरील गॅरेजजवळ दुचाकी लावली आणि जेवणाचे पार्सल घेण्यासाठी गेले. अज्ञात चोरट्याने ऑक्टीवा वाहनाला चावी लावून निघून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. विवेक पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content