हुकुमशाहीने शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध – ॲड. रविंद्रभैय्या पाटील

पाचोरा, प्रतिनिधी । देशात शेतकर्‍यांवर केंद्र शासनाने अन्याय सुरूच असून कायद्यात तृट्या आहेत. याबाबत शेतकर्‍यांनी केलेले आंदोलन हे अयशस्वी करण्यासाठी हुकुमशाही पध्दतीने त्यांना त्रास देणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करतो. राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. केंद्राने शेतकऱ्यांवर लादलेले निर्बंध उठवले नाही तर प्रत्येक तालुक्यात आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रभैय्या पाटील यांनी केले आहे.

पाचोरा येथील महालपुरे मंगलकार्यालयात आयोजित कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा १२ रोजी वाढदिवस असल्याने प्रत्येक कार्यकर्त्यांनी यादिवशी सकाळी १० वाजुन १० मिनिटांनी आप आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावावा. तसेच रक्तदान शिबिर, कृषी मेळावा, रांगोळी स्पर्धा यासह विविध कार्यक्रम घ्यावेत असेही आवाहन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी केले आहे.

यावेळी अध्यक्षस्थानी माजी आ.दिलीप वाघ, माजी आ. मनिष जैन, न. पा. गटनेते संजय वाघ, पाचोरा शिक्षण संस्थेचे मानद सचिव विलास जोशी, जि. प. सदस्या स्नेहा गायकवाड, युवक रा. कॉ. चे जिल्हा प्रवक्ते योगेश देसले, खलील देशमुख, भाजपातुन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. संजीव पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, धरणगांवचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, रा. काँ. च्या जिल्हा अध्यक्ष्या कल्पना पाटील, प्रदेश सरचिटणीस ललित बागुल, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, दत्ता बोरसे, अजय अहिरे व्यासपीठावर होते.

यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतात माजी आमदार दिलीप वाघ यांनी सांगितले की, येणारा काळ हा निवडणुकांचा आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, सोसायटी व नगरपालिका निवडणुकांसाठी आतापासुनच जोमाने कामाला लागा. राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. आणि हे सरकार सर्वसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यामुळे येणाऱ्या बाजार समिती, ग्राम पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आपल्याला निश्र्चितच यश मिळेल. मका खरेदी संदर्भातील विषयावर बोलतांना ते म्हणाले की, शिवसेनेचे स्थानिक आमदारांकडुन यावर कारवाही अपेक्षित होती. याविषयी सोमवार पर्यंत मका खरेदी संदर्भातील सर्व समस्या सुटतील. यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहे.

यावेळी योगेश देसले, विलास पाटील, डॉ. संजीव पाटील, कल्पना पाटील, मनिष जैन यांनी ही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सतिष चौधरी, अजहर खान, शालिग्राम मालकर, भडगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव, अशोक पाटील, ग. स. संचालक सुनिल पाटील, गजानन गावंडे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक नितीन तावडे, सुत्रसंचलन विकास पाटील, तर आभार मुकुंद पाटील यांनी मानले.

Protected Content