निर्दीयपणे गुरांची वाहतूक करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई; गुरांची गौशाळेत रवानगी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात डांभुर्णी कोळन्हावी फाटयावर मध्य प्रदेश या परप्रांतीय चारचाकी वाहनाने अत्यंत निर्दयीपणे गुरांची वाहतुक करतांना एका वाहनास पोलीसांनी पकडले असुन या वाहनातील पाच गुरांची सुटका करण्यात आली असुन, त्यांना गौशाळेत पाठविण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की आज दिनांक ११ जुन रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास किनगाव जळगाव मार्गावरील डांभुर्णी कोळन्हावी फाटयाजवळील ना.धो.महानोर स्कुल जवळ अज्ञात वाहनचालक हा त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन क्रमांक एमपी ४६जी ३१०७या क्रमांकाच्या वाहनाने गोवंश हत्येच्या हेतुने वाहनात निर्दयीपणे पाच गुरांची वाहतुक करीत असतांना मिळुन आला असुन, यावेळी सदरचे वाहन हे रोडाच्याकडे फसल्यामुळे सदरचा प्रकार स्थानिक नागरीकांच्या समोर आल्याने वाहनाच्या ठीकाणी पोलीस व नागरिकांची होणारी गर्दी पाहून अज्ञात वाहनचालकाने त्या ठिकाणाहुन पळ काढल्याचे प्रयत्यक्षदर्शी नागरीकांनी सांगितले.

दरम्यान या वाहनातुन पोलीस व नागरीकांच्या मदतीने वाहनात मिळवुन आलेल्या गुरांची सुटका करून त्यांना मननेल तालुका यावल येथे गौशाळेत पाटविण्यात आले आहे. यावल पोलीस ठाण्यात सदरच्या अज्ञात वाहनचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी उमेश महाजन व पोलीस हे करीत आहे .

Protected Content