पैशांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह चार जणावर गुन्हा दाखल

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांदखुर्द येथील माहेर असलेल्या विवाहितेला नोकरीसाठी माहेरहून साडे तीन लाख रूपये आणावे यासाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील नांदखुर्द येथील माहेर असलेल्या दिपीका तुषार पाटील याचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथील तुषार बाजीराव पाटील यांच्याशी रितीरीवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती तुषार पाटील याने नोकरीसाठी माहेरहून साडे तीन लाख रूपये आणावे अशी मागणी केली. पैशांची पुर्तता न केल्याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या छळाला कंटाळून विवाहिता माहेर निघून आल्या. शनिवारी १८ जून रोजी कासोदा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती तुषार बाजीराव पाटील, सासरे बाजीराव शामराव पाटील, सासू सुनंदाबाई बाजीराव पाटील, रा. वाघडू ता. चाळीसगाव, नणंद शितल धनराज पवार रा. मुकटी ता. धुळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युवराज कोळी करीत आहे.04:31 PM

Protected Content