एमआयडीसी कंपनीतून तीन मोबाईल लंपास; गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । औद्यागिक वसाहतीतील यश इंडस्ट्रीज येथील नुर महंदी हसन यांच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने तीन मोबाईल व २६ हजार ५०० रूपयांची रोकड लांबविल्याची घटना रविवारी मध्यरात्री ३ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नुर हसन यांच्यासह त्यांचा भाऊ शाहीद अली, अब्दूल मेहंदी हसन व जैेनुल आपुद्दीन हे औद्यागिक वसाहतीतील चटई कंपनीत कामाला आहेत़ चौघे यश इंडस्ट्रीजच्या एका खोलीत वास्तव्यास असून रविवारी रात्री १ वाजता संपूर्ण काम आटोपून झोपी गेले होते़ मात्र, खोलीचा दरवाजा उघडल्याची संधी साधत चोरट्याने त्यांच्या खोलीतून ३ मोबाईल व २६ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली़ दरम्यान, मध्यरात्री ३ वाजता जैनुल आपुद्दीन याला जाग आल्यानंतर त्याला खोलीतून चोरटा पळताना दिसून आला. त्यांनी लागलीच नुर याला उठवून घरात चोरी झाल्याचे सांगितले़ खोलीची पाहणी केली असता, त्यावेळीत तीन मोबाईल व शाहीद यांच्या पँटच्या खिशातील रोकड चोरीला गेल्याचे दिसून आले.

अंधाराचा फायदा घेत चोरटा पसार

नुर हसन यांच्या इतरांनी खोलीच्या बाहेर धाव घेवून चोरट्याचा शोध घेतला़ काहीवेळ शोध घेवून सुध्दा तो मिळून आला नाही़ सोमवारी नुर यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत रात्री  घडलेल्या संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. चोरटा सुमारे ४० वर्ष वयोगटातील असून काळे जॅकेट व काळी पँट घातलेली असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content