अहुजा नगरातून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरण कंपनीत नोकरीला असलेल्या तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना अहूजा नगरात घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय हिरालाल (वय-२७) रा. अहुजा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. महावितरण कंपनीत नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. नोकरीवर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १० सीके ९०९२) क्रमांकाची दुचाकी आहे. २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे कामावर येवून त्यांनी घरासमोर दुचाकी पार्किंग करून लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे २१ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आला. अक्षय पाटील याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही दुचाकी मिळून आली नाही. अखेर सोमवारी २२ ऑगस्ट रोजी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करणत आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रकाश चिंचोरे करीत आहे.

Protected Content