शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | महाराष्ट्र युवा खेल परिषद आयोजित राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शेंदुर्णीच्या छत्रपती स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी ४ गोल्ड व ३ सिल्व्हर मेडल प्राप्त केले.
यात दक्ष विठ्ठल लोखंडे, सिद्धेश चंद्रकांत सोनवणे, उमेश दिलावर तडवी आणि तनिष्का बाळू सुळ यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं. राधिका राजेंद्र गवळी, रागिणी सिद्धेश्वर पाटील आणि गरिमा विठ्ठल लोखंडे यांना सिल्व्हर मेडल देऊन गौरविण्यात आलं.
या खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक श्रीकृष्ण चौधरी व महीला प्रशिक्षक लोचना चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विजेत्या खेळाडूंचे राज्याचे क्रीडामंत्री ना. गिरीष महाजन, संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, उपाध्यक्ष अशोक बारी, नगराध्यक्षा विजया खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, जिल्हा सचिव सुनिल मोरे, जामनेर तालुका सेक्रेटरी हरीभाऊ राऊत, संचालक दिनेश विसपुते, रंजना धुमाळ, सुनिल गुजर, रोशन जैन, मुक्ता चौधरी, श्री. तडवी, सचिन जगताप आदींनी अभिनंदन केले आहे.