ठिकठिकाणी एमपीएससीचे परिक्षार्थी रस्त्यावर MPSC Candidates Agitation

मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारने आज एमपीएससीची परीक्षा रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरात परिक्षार्थींमध्ये उद्रेक झाला असून अनेक ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

नियोजित वेळेप्रमाणे एमपीएससीची परीक्षा 14 मार्च रोजी होणार होती. मात्र, सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सरकारने हा निर्णय जाहीर करताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील नवी पेठ येथे संतप्त एमपीएससीच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत आंदोलनाला सुरुवात केली. परीक्षेला अवघे तीन दिवस बाकी असताना अचानक परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी नाराज झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या सुरु केला.

कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी सरकारच्या या धोरणाचा निषेध केला. तसेच, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोल्हापूर शहरातील सायबर चौकात एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जळगावातील विद्यार्थ्यांनीही संताप व्यक्त केला. येथे विद्यार्थ्यांनी कोर्ट चौकात जमत रास्ता रोको केला. नागपुरात सक्करदरा चौकात जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर सांगलीमध्येसुद्धा विधार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे नेते रोहीत पवार यांनी परीक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. विद्यार्थ्यांच्या परीक्षा या झाल्या पाहिजे अशी मागणी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

Protected Content